कृषी प्रधान देशात चाले तरी काय?
मागील वर्षी २०२२ साली कापसाला १६ हजार रुपये भाव होता. तर या वर्षाला कापसाचा भाव ९ हजार रुपये पर्यंत गेला होता. तर उलट जनतेचे सेवक असलेले लोकप्रतिनिधी मात्र यांच्या वेतनात मोठी वाढ होते आहे. महागाई फक्त लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचारी यांच्यावरच येते काय? महागाई चे चटके फक्त लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचारी यांनाच बसते का?
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाही. त्यामुळे शेतकरी राजा हावालदिल झाला आहे. त्यात मागील वर्षी कापसाला भाव १६ हजार रुपये भाव होता.मात्र या वर्षाला ९ हजार रुपये प्रती क्विंटल पर्यंत गेला होता. त्यात पुन्हा मोठी घसरण होऊन, तो भाव ७ हजार ५०० रुपये आले आहे. त्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील सह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळत नाही. मात्र हा कापसाचा दर टप्याटप्याने घसरण होत गेल्याने शेतकरी राजा हवालदील झाला आहे. लोकप्रतिनिधी च्या वेतनात घट नाही. पण कापसाच्या भावात मोठी घट होत असल्याने शेतकरी पुत्र विनोद उमरे मोठी खंत व्यक्त केली आहे.






