spot_img
spot_img
25 C
New York
Friday, July 31, 2026

दहावीच्या निकालात मुलींची बाजी… रिया पेद्दीवार तालुका प्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे कालच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यात मुलींनीच उत्कृष्ट प्रदर्शन देत निकालात बाजी मारलेली आहे . भद्रावती तालुक्याचा विचार केला असता जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावतीची विद्यार्थिनी कुमारी रिया पेद्दीवार हिने ९४.८०% गुण घेत, गुणवत्ता यादी तालुका स्तरावर प्रथम स्थान प्राप्त केले आहे . तर सेंट ऑनस हायस्कूल भद्रावती ची कुमारी ईशरत शेख हिने ९४ % गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत तालुक्यात दुसरी आलेली आहे. याच विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी ऋनाल राजुरकर हिने ९३. ८० % गुण घेत गुणवत्ता यादीत तालुक्यातून तिसरी आलेली आहे.

भद्रावती तालुक्याचा निकाल उत्तम लागला असून तालुक्यातील सर्वच शाळांनी निकालात सरसी प्राप्त केलेली आहे. तालुक्यात विविध शाळेत ९० % पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी बरेच आहेत. ग्रामीण व शहरी भागातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

दहावीच्या निकालात भद्रावती तालुक्यातील प्रथम आलेली रिया पेद्दीवार हिचे जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती चे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सेन्टेन्स हायस्कूल भद्रावती येथून तालुका द्वितीय व तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीनींचे मुख्याध्यापिका ग्रेसी थॉमस यांनी अभिनंदन केले आहे. भद्रावती पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. महाकाळकर यांनी समस्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!