चंद्रपूर : वरोरा शहरातील फुकट नगर येथे लाकडी दांड्याच्या सहाय्याने एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना आज शनिवार २० मे रोजी सकाळी 9:30 वाजता उघडकीस आली.
रितेश रामचंद्र लोहकरे ( 19 ) वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे. आज द्वितीय वर्षाचा पेपर होता, पेपरपूर्वी रितेश दुचाकीवर मित्रांसोबत फुकटनगर येथे फिरत होता. रितेशचा मृतदेह हा मानवी वास्तीपासून 50 मीटर अंतरावर आढळला. ही घटना होत असताना कोणालाच कसे समजले नाही, याबाबत आश्र्चर्य व्यक्त होत आहे. रितेश रामचंद्र लोहकरे हा बोर्डा येथील विकास नगर येथील रहिवासी होता. सकाळी एक मित्राला घेऊन फुकटनगर भागात गाडीवर फिरत होता. फुकटनगर येथील वनविभागाचे गेटजवळ फुकटनगर मधीलच आरोपी अनिमेष रेड्डी लाकडी दांड्याने मृतक रितेशच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात त्याचा जगेच मृत्यू झाला. रितेशसोबत फिरणारा संशयित पियुष ढेंगळे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी अनिमेष रेड्डी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी रेड्डीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली. घटनेच्या पुढील तपास एचडीपीओ आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कोचारे करत आहे. सदर घटना प्रेम प्रकरण घडली अशी माहिती आहे.






