spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

रोटरी क्लब भद्रावती द्वारे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

रोटरी क्लब भद्रावती आणि माधवबाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती येथे आयोजित आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिरात हृदयरोग , मधुमेह, ब्लॉकेज , उच्च रक्तदाब इत्यादी आजारांवर उपचार व शास्त्रोक्त मार्गदर्शन माधवबाग येथील तज्ञ डॉक्टर करणार आहेत.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेली रोटरी क्लब भद्रावती यांनी यावेळी सामान्य मानवाचे आरोग्य चांगले राहावे, आरोग्य विषयक जनजागृती व्हावी, त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन लाभावे म्हणून माधवबाग चंद्रपूर येथील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रोग उपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. हे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर हुतात्मा स्मारक, नागमंदिर जवळ भद्रावती येथे दिनांक 28 मे 23 रोजी सकाळी ९ ते१२ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. या आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरात माधवबाग चंद्रपूर चे डॉक्टर प्रीती सरबेरे व संजय ठेकाळे व त्यांची चमू उपस्थित राहणार आहे.

या आरोग्य शिबिरात हृदयरोग, मधुमेह , उच्च रक्तदाब , थायरॉईड व लठ्ठपणा आदी आजारांवर महत्वपूर्ण तपासण्या व मार्गदर्शन या शिबिरात उपलब्ध होणार आहेत . शिबिरात रूग्णांनी अग्रीम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्रमांक 9373947884 या वर संपर्क साधावा, शिबिरात येताना रुग्णांनी आपल्या डॉक्टरची फाईल सोबत आणावी.

तेव्हा भद्रावती शहरातील व परिसरातील नागरिकांनी आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भद्रावती रोटरी क्लबचे अध्यक्ष, डॉक्टर मला प्रेमचंद , सचिव, अनिल धानोरकर कोषाध्यक्ष, सुधीर पारोदे , डॉ.ज्ञानेश हटवार , युवराज धानोरकर, विवेक आकोजवार, प्रकाश पिंपळकर आणि समस्त रोटरी क्लब ऑफ भद्रावती यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!