चंद्रपूर : चंद्रपूरच्या फूड ऍण्ड ड्रग्स विभागाचे निरीक्षक चंद्रमणी डांगे वय (५१) यांच्या कारचा अपघात झाला. अपघात एवढा भयंकर होता की अपघातात चंद्रमणी डांगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सुमना डांगे वय (४८) आणि मुलगी दिया डांगे वय (२१) किरकोळ जखमी झाले. संपूर्ण परिवारासह ताडोबा व्याघ्रप्रकल्प पाहिल्यावर ते मोहर्ली येथून आज दुपारी चंद्गमणी डांगे हे आपल्या परिवारासह नागपूर ला जाण्यासाठी निघाले. मात्र चिंधीमाल फाट्या जवळ त्यांचं कार वरून नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधिकारी घटनेचा अधिक तपास करीत आहेत .






