spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

रोटरी क्लबतर्फे भद्रावती शहरात ७ ठिकाणी पाणपोई

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब तर्फे भद्रावती शहतील महत्त्वाचे ठिकाणी पाणपोई ची सुविधा निर्माण केली आहे. मागील काही दिवसांपासून वाढते तापमान लक्षात घेता, नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने भद्रावती शहतील रोटरी क्लबतर्फे नागरिकांसाठी शहरातील महत्त्वाच्या ७ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद तसेच सचिव अनिल धानोरकर यांच्या हस्ते या पाणपोईंचे उद्घाटन करण्यात आले.

उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना शुध्द व थंडगार पाणी मिळावे यासाठी रोटरी क्लबतर्फे शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत. भद्रावती शहरातील अली पेट्रोल पंप, डॉ. माला प्रेमचंद हॉस्पिटल, सक्सेस पॉईंट कंप्युटर, अमृत रेस्टॉरंट, जुना बस स्टॉप येथील आदित्य ट्रेडर्स, नगर परिषद, विजासन रोड येथील एपी रेस्टॉरन्ट या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच बाजारातील माता मंदिराजवळ वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुध्द व थंड पाणी मिळणार आहे.

यावेळी रोटरी क्लब भद्रावतीचे सुधीर पारधी, अब्बास अजानी, हनुमान घोटेकर, अविनाश सिद्धमशेट्टीवार, डॉ.ज्ञानेश हटवार, विक्रांत बिसेन, रुक्साना शेख, कीर्ती गोहने, कोमल नागोसे, वंदना धानोरकर, दिलीप राम, विनोद कामडी, विवेक अकोजवार, आनंद क्षीरसागर, युवराज धानोरकर, किशोर पत्तीवार, प्रकाश पिंपळकर, किशोर भोस्कर, गिरीश पवार तसेच समस्त रोटरीयन यांची विशेष उपस्थिती होती.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!