spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स बनली पर्यटक वाहतुकीचे साधन…

भंगारात निघालेली ऍम्ब्युलन्स वापरात कशी ?


भंगारात निघालेली ऍम्ब्युलन्स वापरात कशी ?


वरोरा….. चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हा वेगवेगळ्या समस्येने तालुक्यातील ओळखले जाते आहे, सध्या येथील रुग्णवाहिका ही पर्यटक वाहतुकीचे साधन म्हणून ओळख निर्माण केली आहे..
चिमूर,वरोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली सावरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राला वरोरा तालुक्याचे व चिमूर तालुक्याचे गावे मोठ्या प्रमाणात जोडलेली आहे, ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीची किंवा महिलेची तब्येत बिघडल्यास रुग्णवाहिकेची मोठी मदत होते परंतु या ठिकाणी मात्र ॲम्बुलन्स अपवाद ठरत आहे मागील 2 वर्षा पासून आरोग्य विभागाने भंगारात काढलेली ऍम्ब्युलन्स पी. एच. सी. च्या आवारात उभी असायला हवी पण त्या उलट हे ऍम्ब्युलन्स विना नंबर प्लेट सर्रासपाने वापरात येताना दिसत आहे. अशात जर कुठली घटना झाल्यास याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
सवारी येथील ॲम्बुलन्स सध्या निमडेला गेटमधून रामदेगी या ठिकाणी पर्यटक नेताना आढळून येत असून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे वचक नसल्यामुळे हा प्रकार जास्त प्रमाणात घडत आहे..
एकीकडे ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधेसाठी जनता तरसत असून परिसरातील गरोदर माता, स्तनदा माता, ज्येष्ठ नागरिक यांना वेळेवर उपचार करीता आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मिळत नसल्याने त्यांना खाजगी वाहन करून उपचारासाठी जावे लागते. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचावी या करिता शासन आरोग्य यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करते परंतु सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केलेली आहे…

याबाबत आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी चौधरी यांना फोनद्वारे विचारपूस केली असता mh 34,a7073 ही ॲम्बुलन्स भंगार मध्ये( कंडम )असून तिला आरोग्य विभागाने रितसर पत्र देऊन तिला भंगारात काढले आहे. आणि माझ्याकडे ठेवण्यास सांगितले असे त्यांचे म्हणणे आहे, सदर वाहनाला खर्च लावून मी दुरुस्त केलेली आहे असे सांगितले….

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!