spot_img
spot_img
7.3 C
New York
Saturday, November 28, 2026

झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती तर्फे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली

भद्रावती :

झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावती तर्फे एक वार साहित्याचा हा कार्यक्रम शुक्रवारी होत असतो. दिनांक 30 ऑक्टोबर २०२६ रोजी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ” देशाच्या उज्वल भवितवण्यासाठी वंदनीय महाराजांच्या ग्रामगीतेतील समाज प्रबोधनात्मक विचारांचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष अंगिकार करणे आवश्यक झाले आहे”, असे मार्गदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले.

झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीच्या वतीने एक वार साहित्याचा या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी प्रित्यार्थ सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष कुचनकर महाराज आणि प्रमुख अतिथी प्रा. डॉ ज्ञानेश हटवार सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्वतच अतिथी व कवींनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतून समाज प्रबोधन, शिक्षण, राष्ट्रभक्ती यावर विचार मांडले. यावेळी भद्रावती येथील बरेच ज्येष्ठ, युवा व बालकवींची उपस्थिती लाभलेली होती. त्यांनी याप्रसंगी सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांना आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाचे प्रस्तावित झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव शालिक दाणव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दर्वे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश भोयर यांनी केले. या कार्यक्रमाला कवी कबीर शेख, शंकरराणा वाणी, रमेश भोयर, विनोद ठमके सर, अश्विनी कुडमाते, महेंद्रसिंग साहेब, गजेंद्र कुडमाते, बालकवी मयंक दर्वे, कनक कुडमाते, तसेच इतरही साहित्यिक, कवी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!