यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न…
विविध उपक्रमांनी वाचन प्रेरणा दिन साजरा…
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न, मिसाईल मॅन, संशोधक, लेखक, डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख अतिथी डॉ ज्ञानेश हटवार, प्रा. उज्वला वानखेडे, प्रा किशोर ढोक, प्रवीण मत्ते हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीला व डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी “डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात बाळगावा व आपले ध्येय साध्य करावे”, असे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ ज्ञानेश हटवार यांनी व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी वाचनाचे जीवनातील महत्त्व व त्याची आवश्यकता विशद केली. प्रा उज्वला वानखेडे यांनी वाचन प्रेरणा दिनावर आधारित स्वरचित कविता सादर केली. प्रा. किशोर ढोक, प्रवीण मत्ते यांनीविद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी कु. प्रिती पांडे, अंजली दहेकर, मयुरी येडमे या विद्यार्थ्यिनींनी भाषणे दिलीत, व जानवी ढोक, समता साव, प्रिया जगझाप यांनी अभिवाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तक प्रदर्शनीला भेट दिली, व विविध पुस्तके बघितले. वाचन कट्ट्याला विद्यार्थ्यांची विशेष पसंती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा डुकरे हिने केले तर काराक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर नन्नावरे यानी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. प्रेमा पोटदुखे, भीष्माचार्य बोरकुटे, हरिहर मोहरकर, डॉ प्रशांत पाठक, प्रणिता बोकडे, प्रतीक नागपुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






