साने गुरुजी सोसायटी भद्रावती येथील उपक्रम…
भद्रावती
१५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र भद्रावती येथील साने गुरुजी सोसायटीत भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. भद्रावती शहरातील हिरवीगार सोसायटी म्हणून तिची ओळख निर्माण व्हावी यासाठी असे उपक्रम राबवले जातात. सोसायटी राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भद्रावती येथे असलेल्या साने गुरुजी सोसायटीत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोसायटीतील ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. साने गुरुजी सोसायटी येथील जेष्ठ नागरिक गुलाब चिडे यांच्या पुढाकारातून स्वयं प्रेरणेने ओपन स्पेस परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
विशेष म्हणजे दोन वर्षाआधी सुद्धा १५ ऑगस्टच्या दिवशी या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व त्यांचे संगोपन करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमात वसंता मत्ते, राजेश वासाडे, अनंता आखाडे, डॉ ज्ञानेश हटवार, भिष्माचार्य बोरकुटे, योगेश नागोसे, दुष्यंत मत्ते, पुंडलिक घुगुल, कैलास उरकुडे, गुंडमवार सर, खाडिलकर , रीमा वासाडे, उषा घुगुल, उरकुडे मॅडम, खाडिलकर मॅडम, माधुरी मोहरकर आदी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. अशा उपक्रमाचा आदर्श नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.






