spot_img
spot_img
32.4 C
New York
Friday, June 5, 2026

वरोरा तालुक्यातील धानोली येथे अंदाजे २० ब्रास अवैध रेती साठा जप्त…

एवढ्या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले…

परिसरात आणखी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अवैध रेतीसाठे असण्याची दाट शक्यता…

आज दि. २८ मे २०२६ ला सकाळी ८ वाजता वरोरा ताुक्यातील धानोली नदी काठावर ४ ठिकाणी अंदाजे २० ब्रास रेती साठा आढळुन आल्याने सदर रेतीसाठा कोणाच्या मालकीचा आहे का याची चौकशी गावातील पोलीस पाटील यांनी केली. २ ते ३ तास उलटूनही साठ्याचा मालकी हकक असल्याचे दावा कुनीही न केल्यामुळे या अवैध रेती साठ्याचा मोका पंचनामा करून जप्त करण्यात आला.

संबंधित रेतीसाठा वरिष्ठांच्या आदेशानुसार धानोली ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात येणार असल्याचे महसूल कर्मचारी यांनी सांगितले.

तालुक्यातील शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली असून घरकुलासाठी लागणारी रेती ही तुराणा घाटावरून आणावी लागते जे की वाहतुकीच्या दृष्टीने परवडण्याजोगे नाही तालुक्याच्या शेवटच्या टोकावरून तुराना घाटाचे अंतर 30 किलोमीटरच्या वर येत असल्याने वाहतुकीसाठी दहा ते बारा हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने घरकुल लाभार्थीना नाईलाजाने अवैध रेती तस्करांकडून मिळणाऱ्या सहा ते सात हजार प्रति ट्रॅक्टर या भावाने रेती खरेदी करुन घर बांधकाम करण्यात येत आहे, त्यामुळे जिल्हा महसूल विभागाने परिसरातच गावाशेजारी असलेल्या नाल्यातून, नदीपात्रातून रेती साठा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केलेली आहे…

शेगाव परिसरात अशाच प्रकारे रात्री व दिवसा ढवळ्या आष्टा नदी, परोधी नदी, धणोली नदी, किन्हाला परिसर, वायगाव परिसर, निमदेला परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू असून या अवैध रेती तस्करावर कारवाई कोण करणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!