spot_img
spot_img
20.7 C
New York
Thursday, July 30, 2026

ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात

एक ठार एक गंभीर

शेगाव मधील पद्मावार राईस मिल जवळ ची घटना

आज सकाळी दहाच्या सुमारास वरोरा वरून चिमूर कडे जाताना शेगावच्या आधी असलेल्या पद्मावार राईस मिल जवळ एका दुचाकी क्र. एम.एच.३४ बी.एस. १८८७ व विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली यांचा अपघात येऊन दोन जण अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊन एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

सविस्तर वृत्त असे की महालगाव येथील विना नंबर महिंद्रा कंपनीचे अर्जुन ट्रॅक्टरवर विना नंबर ट्रॉली ही राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरून पद्मावर राईस मिल कडे वळण घेत असताना दोन युवक विना हेल्मेट दुचाकीने येत होते. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून दुचाकी अतिशय वेगात असल्याकारणाने सरळ ट्रॅक्टर वर येऊन आढळली अपघात एवढा भीषण होता की दुचाकीची खोपडी, नंबर प्लेट तुटली व दुचाकी ट्रॅक्टर च्या समोरील चाकाच्या मागे फसली या मद्ये दोन्ही युवक गंभीर रित्या जखमी झाले. शेगाव पोलिसांनी मोक्का पंचनामा केला असून ट्रॅक्टर मुंडके विना नंबर व ट्रॉली विना नंबर बदकी यांच्या महालगाव यांच्या मालकीचे पोलीस स्टेशन येथे जमा केले असून. दुचाकी वरील जखमी स्वामी मलय्या यमलुवार वय ३२ वर्ष व संतोष राजू पवार वय १८ वर्ष दोन्ही राहणार भद्रावती. दोन्ही गंभीर जखमी युवकांना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले असून यातील स्वामी मलय्या यमलुवार यांना डॉक्टर यांनी मृत घोषित केले असून पवार ला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातामुळे परत एकदा शेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्ण वाहिका वेळेवर मिळत नसून. वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसून, अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. शेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णपणे कार्यान्वित असते तर जखमींना वरोरा येथे हलवण्याची वेळ आली नसती व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे कदाचित मृताचे प्राण वाचले असते.
तसेच शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर दुचाकी व चार चाकी यांच्यावर नंबर प्लेट न लावता गाड्या चालवण्याची फॅड वाढलेली आहे. अवैध रेती वाहतूक करणारे एकाही ट्रॅक्टर वर ट्रॉलीवर नंबर टाकलेला नाही परंतु परिवहन विभाग याकडे कुठे जाणीवपूर्वक काना डोळा करत नाहीये? ना असा प्रश्नचिन्ह यानिमित्ताने उपस्थित होत आहे

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!