spot_img
spot_img
8 C
New York
Thursday, March 26, 2026

21 वर्षीय तरुणीची तलवारीने हत्या…,आई गंभीर जखमी

घरगुती वादाचे खुणात पर्यवसन…..

भद्रावती

भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे घरगुती वादातून अतिशय धक्कादायक घटना घडली असून भावानेच आपल्या 21 वर्षीय सख्ख्या बहिणीची तलवारीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईलाही गंभीर जखमी करण्यात आले असून तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.

मृत तरुणीचे नाव संजीवनी भोंडे (वय 21 वर्षे) असे असून आरोपी भाऊ सुरज भोंडे याने तलवारीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घरातील किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक चिघळला आणि संतापाच्या भरात सुरजने घरात असलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेदरम्यान मध्ये पडलेल्या आई पुष्पा भोंडे यांनाही तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातावर व शरीरावर खोल जखमा झाल्या असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना तात्काळ भद्रावती येथून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी पती शंकर भोंडे यांनी मुलगा सुरज याला भडकावून ही हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज भोंडे व त्याचे वडील शंकर भोंडे यांना ताब्यात घेतले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे झिंगुजी वॉर्ड परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!