यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक संलग्नित डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिव डॉ कार्तिक नीलकंठराव शिंदे, प्रमुख अतिथी विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एल.एस.लडके, प्राचार्य निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, डॉ. सुधीर मोते प्राचार्य यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती हे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ कार्तिक शिंदे यांनी शिवाजी महाराजांचे कुशल प्रशासन व शुक्ष्म नियोजन यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिवजयंती निमित्त या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. जयंत वानखडे यांनी ”शिवाजी महाराजांच्या चरित्र आणि त्यांच्या जीवनातील हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या सर्व घटनांचा आढावा घेतला . शिवरायांचा इतिहास मानवी जीवनाला दिशादर्शक ठरेल” असे मत व्यक्त केला. प्राचार्य डॉ. लडके व प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रवीण मत्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश नंदनवार यांनी केले. या कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत चालणाऱ्या सर्व शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






