जि.प. शाळा भटाळीचा स्तुत्य उपक्रम…
भद्रावती
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी दैनंदिन होत चाललेल्या संस्काराचे समाजात प्रदर्शन व्हावे यासाठी दिनाक १८/०२/२०२६ बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भटाळी येथे सीखे संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांनी वर्षभर शिकलेल्या भाषा व गणित विषयांच्या संकल्पनांवर आधारित तयार केलेले मॉडेल, चार्ट, तक्ते गोष्टीचे पुस्तकं, विद्यार्थ्यांनी सोडवलेली कार्यपुस्तिका यांचे सुंदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा भटाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात प्रदर्शना पूर्वी गावातून प्रभात फेरी काढून, शैक्षणिक घोषणा देवून, शिक्षणविषयक जनजागृती केली. या प्रदर्शनाचे उद्दघाटन सौ गीताताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश निखाडे , सदस्य श्री सचिन उरकुडे व किशोर रासेकर, प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक TIP शिक्षिका सौ. सविता नागोसे यांनी केले, तसेच या प्रदर्शनाचा उद्देश प्रतिपादित केला. हा कार्यक्रम सीखे कोच संतोष वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावली.






