spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये सरिता म्हेत्रे कलढोणे सन्मानित

पुणे

एम. एस. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे २ ते ५ जानेवारी मध्ये चार दिवस दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून तसेच बेळगाव, तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेश, अबुधाबी, गोवा या ठिकाणाहूनही कवी कवयित्रींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या फेस्टिवलचे आयोजन फुलेप्रेमी, संविधान दूत विजय वडवेराव यांनी केले.

विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाला सर्व कवयित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत उपस्थित होत्या. सर्व कवयित्रींना आयोजक संविधान दूत विजय वडवेराव यांच्याकडून हिरवी साडी भेट देण्यात आली होती. फेस्टीव्हल साठी ७०० ते ८०० जणांची उपस्थिती होती. उपस्थितांसाठी सकाळचा नाश्ता, रुचकर जेवणाची मेजवानीची व्यवस्था सर्वांना मोफत करण्यात आली. सर्व कवींना संविधान पुस्तक, संविधानमय पॅड,सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यात माझे संविधान माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येतो. यात संविधान दूत म्हणून कार्य करणाऱ्या फुले प्रेमींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दूत पुरस्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना फुलेप्रेमींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात जुन्नर येथील कवयित्री सरिता म्हेत्रे कलढोणे यांना हा मानाचा पुरस्कार या फेस्टिवलमध्ये प्रदान करण्यात आला. सरिता म्हेत्रे कलढोणे या जुन्नर येथे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!