बोर्ड परीक्षेच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन…
चारही दिवस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर प्रतिनिधी
.
चंद्रपूर जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघातर्फे विद्यार्थ्यांमध्ये बोर्ड परीक्षेच्या कृतीपत्रिका सोडवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, यादृष्टीने कृतीपत्रिकासंदर्भात आयोजित चार दिवसीय चर्चासत्र आभासी सभांद्वारे नुकतेच पार पडले.
प्रथम पुष्पाचे उद्घाटन मराठी महासंघाचे संस्थापक सचिव प्रा. बाळासाहेब माने यांनी केले. मराठी विषय कृतीपत्रिका प्रत्येक विभागानुसार कशी सोडवायची, कृतीपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी, प्रत्येक विभागावार गुणांकन यावर सविस्तर मार्गदर्शन नागपूर येथील प्रा. डॉ . माया रंभाळे यांनी केले.
दुसऱ्या दिवशी नागपूर येथील प्रा. डॉ. विजय राठोड यांनी उपयोजित मराठी या विषयावर बोलताना त्यांनी जीवनामध्ये उपयोजित मराठीचे महत्त्व विषद करून परीक्षेच्या दृष्टीने उपयोजित मराठी घटकांची विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी, यावर विचार मांडले.
त्याच सत्रात नागपुरातील प्रा. अमित गायधने यांनी पद्य घटकावर विस्तृत मार्गदर्शन केले. यातील रसग्रहण, आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य, स्वमत, अभिव्यक्ती आदी विषयांवर विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करून लेखन कसे करावे, कृतीपत्रिका सोडवताना घ्यावयाची दक्षता, हेही सांगितले.
तिसरे सत्र कृतीपत्रिकेतील प्रथम विभाग म्हणजे गद्य यावर प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी गद्य घटकातील स्वमत, अभिव्यक्ती, गद्य आकलन यावर विविध उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्याच दिवशी दुसरे पुष्प यवतमाळ येथील जिल्हा प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार यांनी व्याकरण या घटकातील अभ्यासक्रमातील सर्व उपघटकांना स्पर्श करून विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे कशी लिहायची? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
याशिवाय लेखन प्रकारात निबंधलेखनाची तयारी करताना कोणताही एक निबंध लेखन विचारात घेऊन त्यानुरूप विषयाची तयारी करावी व त्याचप्रकारचे निबंध वाचावे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. निबंधात प्रमाण भाषा व व्याकरण शुद्धतेकडेही लक्ष द्यावे, असे सांगितले.
शेवटच्या सत्रात नागपूरच्या डॉ. शालिनी तेलरांधे यांनी कथा एक साहित्यप्रकार व पाठ्यपुस्तकातील दोन कथा ‘शोध आणि गढी’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्राच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचे मार्गदर्शक वाक्त्यांनी समाधान केले.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या मार्गदर्शन कार्यशाळेला प्रत्येक दिवशी जिल्ह्यातील 90 ते 95 विद्यार्थी सहभागी झाले होते, ही विशेष बाब म्हणावी लागेल. या चार दिवसीय कार्यशाळेचे अध्यक्षपद प्रा. बाळासाहेब माने, मुंबई , प्रा. डॉ. विजय हेलवटे, चंद्रपूर , डॉ. ज्ञानेश हटवार, भद्रावती, प्रा. संजय लेनगुरे भंडारा यांनी भूषविले तर उद्घाटन प्रा. संपत गर्जे, पुणे , प्रा. संजय पाटील, रायगड, प्रा. अंजना खताळ, मुंबई , प्राचार्य धर्मराज काळे गडचांदूर यांच्या हस्ते पार पडले.
सदर कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पांडुरंग कंद, पुणे, प्रा. दिलीप जाधव,सांगली, डॉ. स्मिता भुसे,नगर, डॉ. प्रतिभा बिश्वास, मुंबई , डॉ. विठ्ठलराव चौथाले, गडचिरोली , प्रा. अंकुश प्रकाश, पुणे, प्रा. पवन कटरे, गोंदिया , प्राचार्या, विजया मने, गडचिरोली , प्रा. चेतन नाकाडे, प्रा. जितेंद्र टिचकुले, प्रा. प्रांजली दरवळकर, प्रा. प्रियंका बोपचे, प्रा. ओमप्रकाश ढोरे, प्रा. सदानंद बोधाने, प्रा. नरेश बुच्चे, प्रा.ऊ सुभाष पारिसे, प्रा.जागेश्वर भेंडारकर, प्रा. ऋषी दिघोरे, प्रा. सारंग श्रीराम. प्रा. लोमेश दरवडे, प्रा. प्रवीण वंजारी. प्रा. संजय कावरे, प्रा. अरुण मेश्राम, प्रा. संजय गोळे, प्रा. रवींद्र काळे यांनी भूषविले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. नामदेव मोरे यांनी केले. संचालन प्रा. शुभांगी मोहितकर, प्रा. रेणुका देशकर, प्रा. राहुल ठोंबरे, प्रा. वसुधा देवगडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. योगिता धांडे, प्रा. गजानन सातपुते, प्रा. ज्योती लालसरे, प्रा. महेश गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. देविदास सालवाटकर, प्रा. प्रमोद भोयर, प्रा. नरेंद्र विखार प्रा. संजय मुंडे सर, प्रा. किशोर ढोक, प्रा. स्वाती गुंडावार, प्रा. विनोद कुनघाडकर सर, प्रा. राजू केदार सर, प्रा.आशा शेन्डे, प्रा. ग्यानीदास गहाणे, प्रा. कांबळी मॅडम, जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.






