भद्रावती
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे एड्स जनजागृती कार्यक्रम व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील समुपदेशक शितल भडके यांनी किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन केले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोर्डी, भद्रावती येथे किशोरवयीन मुलांसाठी एड्स जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते तर मार्गदर्शक म्हणून समुपदेशक शितल भडके व दर्शना मून हे विचारमंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दर्शना मून यांनी एड्स विषयक जनजागृती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.आपण आरोग्याबद्ग्रादल सजग राहीले पाहिजे असे प्रतिपादन केले. ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील समुपदेशक शितल भडके यांनी किशोरवयीन मुला मुलींनी आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, व या वयात होणाऱ्या शारीरिक बदलाची माहिती यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा प्रेमा पोटदुखे यांनी केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






