spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

माहिति दिल्याच्या कारणावरून रेती माफियाची एकाला जबरण मारहाण

शेगाव बु परिसरात रेती माफियाचा हौदास

मुजोर रेती माफियाच्या मुसक्या आवळणार कोन?

आज दि. 25 नोव्हेंबर ला दुपार च्या सुमारास शेगाव बु पोलीस स्टेशन हद्दीतील वायगाव येथील कमलेश राजेंद्र गडमडे या इसमाला चारगाव बु येथील काही रेती माफिया यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे.
शेगाव परिसरात दिवसेंदिवस रेतीय माफिया उलट सक्षम होतांना दिसून येत आहे. रेती माफियांना कायद्याचा किंवा कुठल्याच गोष्टीचा धाक उरलेला दिसत नाही जणू हेच कायदा सांभाळतात की काय अशा प्रकारे रेती माफियांची वागणूक सुरू आहे. यामध्ये भर दिवसा रीती तस्करी करणे, विरोध केल्यास अंगावर गाडी घालणे, पत्रकारांना धमकी देने, माहिती देणाऱ्यांना मारहाण करणे यासारख्या घटना घडत आहे. आजही चारगाव येथील काही रेती माफीया यांनी तहसीलदार यांना माहिती दिल्याच्या संशयाच्या कारणावरून राजेश गडमडे या इसमास पावडरच्या दांड्याने मारण केली आहे. ज्यामध्ये त्याच्या नाकातून रक्त बाहेर आले असून पाठीला व पायाला वळ आलेली आहेत. त्यामुळे रेतीमाफिया हे कायद्याच्या वर तर गेले नाहीत ना? आणि जर हे कायद्यालाही जुमानत नसेल तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या मुळे समाजात अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या रेती माफियाच्या मुसक्या शेगाव पोलीस आवळणार का? व या नंतर महसूल विभाग अशा रेती माफियावर थातुर्मातूर कारवाही न करता नेहमी कारवाई करणार का? असा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!