भद्रावती : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धा चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या 14 वर्षा आतील मुला मुलीच्या संघाने जिल्हा स्तरिय रग्बी स्पर्धत येथील श्री साई कॉन्हेंटच्या खेळाडूनी यश संपादन करून विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

14 वर्षा आतील मुलांच्या संघात यात वर्ग 6 चा अभिनव यादव, श्रेयश झंझाड, विराज वानखेडे, प्रित जंजलवार, आर्यन बदखल, अदविक ठाकरे, वर्ग 7 चा गौरव झाडे, वर्ग 8 चा झयान शेख, जोयल निमगडे, उदय व्यवहारे, अंगीश रोडे सक्षम जयकर. या खेळाडूचा समावेश आहे तर १४ वर्षा आतील मुलींच्या संघात वर्ग ६ ची अनुष्का हेंडाळकर, टेरिसा भलमे, आरोही बावणे, श्रेया उराडे, वर्ग 7 ची मनस्वी गाडगे त्रिशा चौधरी, आराध्या नन्नावारे, आराध्या दैदावार, वर्ग 8 ची श्रुती मेश्राम, मृणमय संदोकर, प्रांजली पिंजारकर, काव्या कोथळे या खेळांडुचा समावेश आहे. मुला मुलींच्या गटात दमदार कामगिरी करत विजय मिळविला व विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित करीत श्री साई कॉन्व्हेंट चे शिरोपेच्यात मानाचा तुरा रोवला.
विभागस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागस्तरावर करणार आहे विजयी संघातील खेळांडूचे संस्थेच्या अध्यक्षा कांताताई गुंडावार, सचिव प्रा. अतुल गुंडावार, रूपा गुंडावार, मुख्याध्यापक अतुल बडकेलवार क्रिडा शिक्षीका अलोका विश्वास तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.






