निळकठरा शिंदे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
भद्रावती
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथील तलवारबाजी खेळाडूची भारतीय आंतर विद्यापीठ संघाकरिता निवड झाली. स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथील खेळाडू ओम पायघन, साहिल जीवतोडे, संकेत दडमल, अमन मसराम, वैभव जगझाप, एकून ४ मुले व नियती कोवे, रोशनी चतारे, डॉली चेट्टी, अनुष्का काळे, भूमिका मेश्राम, साहिबा शेख अशा एकूण ०६ मुली खेळाडू भारतीय आंतर विद्यापीठ खेळाकरिता गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर (पंजाब) येथे गेलेले असून संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. विशाल नि. शिंदे व कोच म्हणून श्री. सूरज दखणे व श्री. आदित्य सातपुते हे काम सांभाळत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत तलवारबाजी (मुले/मुली) स्पर्धेत भारतीय आंतर विद्यापीठ संघात निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील वरील खेळाडूंची निवड झालेली आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मार्फत खेळाडूंना कलर कोट प्राप्त झालेले आहे. सदर खेळाडूंना विद्यापीठ गडचिरोली चा गोल्ड मेडल प्राप्त झाले. ०२ ते १२ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर (पंजाब) येथे भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत हे खेळाडू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आपल्या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल शिंदे, व चंद्रपुर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. डॉ. राकेश तिवारी तसेच प्रा. डॉ. अनिता लोखंडे संचालिका क्रीडा व शारिरीक शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना दिलेले आहे.
सदर खेळाडूचा महाविद्यालयाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला असून यावेळी भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. डॉ. अपर्णा धोटे, प्रा. डॉ. नत्थू वाढवे, प्रा. डॉ. दहेगावकर, प्रा. डॉ. नरेंद्र हरणे, प्रा. डॉ. शशिकांत शित्रे, प्रा. संदीप प्रधान, अजीज शेख, विशाल गौरकार, खुशाल मानकर, पांडुरंग आखतकर, प्रमोद तेलंग, बंडू पेंदोर उपस्थित होते. खेळाडूंना पुढील वाटचाली करिता सुभेच्छा देण्यात आल्यात. सदर विद्यार्थ्यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता निवड झाल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.






