भद्रावती : येथील आयुध निर्मानी चांदा भद्रावती येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ कामगार पुरस्कार नुकताच कार्यक्रम संपन्न झाला. एम.आय. मयुनिशन्स इंडिया लिमिटेड स्थापना दिवसा निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण कुमार चीफ जनरल मॅनेजर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गौरव मालवी डी.जि.एम., डब्लू. डब्लू.ऐ. अध्यक्षा व अनेक अधिकारी गण मंचावर उपस्थित होते.

जे कर्मचारी आयुध निर्मानी मध्ये देशासाठी मेहनत घेऊन तन – मनांनी अहोरात्र मेहनत घेऊन शासकीय कामामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये निवड प्रक्रिया असते यामध्ये बरेच कामगारांचा उत्कृष्ठ कामगार म्हणून सम्मान केला जातो. यावेळी उत्कृष्ठ कामगारांची दखल घेऊन निखिल नानाजी घिवे यांना अग्नीरत्न कॅटेगरी मधून निर्मानीतील यांची निवड करण्यात आली. निखिल घिवे यांना प्रवीण कुमार चीफ जनरल मॅनेजर / आय.ओ.ऐफ.ऐस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन अंकिता मिश्रा यांनी केले व आभार प्रदर्शन संगीता मुळे यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये हजारो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






