spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

भद्रावती येथे २ नोव्हेंबर ला शिवसेना उबाठा तर्फे आढावा बैठकीचे आयोजन

लोकसभा संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती

भद्रावती : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या संदर्भात लवकरच आचारसंहिता जाहीर होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत प्राप्त होत आहे. त्यासंदर्भात आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेची मशाल प्रज्वलित करण्यासाठी, शहर व तालुक्यातील संघटन मजबूत करण्यासाठी, निवडणुका जिंकण्याकरिता रणनिती ठरविणे, शिवसेनेच्या परंपरागत मतदारांना शिवसेनेच्या प्रवाहात आणने आदी चे नियोजन करण्यासंदर्भात २ नोव्हेंबर रोज रविवारला बालाजी सभागृह भोजवार्ड भद्रावती येथे सकाळी ११.०० वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर आढावा बैठकीला आमदार तथा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थिती सह शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात ही आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तरी शिवसेना उबाठा च्या सर्व आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवा सेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, तसेच पक्षाशी संलग्नित सर्व विंगचे आजी माजी पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल तथा शिवसेना शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!