चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह चंदनसिंह रावत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध चंद्रपूर, गडचिरोली बँक कर्मचारी युनियन तर्फे आज दिनांक १२ ला बँकेच्या प्रमुख कार्यालयात करण्यात आला.

संतोषसिंह चंदनसिंह रावत यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रगतीपथावर जात आहे. बँकेचे ध्येय, धोरण आणि प्रशासन अतिशय चोखपणे बजावत असताना व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना हा हल्ला अतिशय निंदनीय असून आरोपीला त्वरित अटक करावी अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मत बँक युनियन चंद्रपूर, गडचिरोलीचे अध्यक्ष संजय शंकरराव सहारे यांनी व्यक्त केले.
संघटनेतर्फे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या काळ्याफिती लावून बँकेच्या प्रमुख कार्यालयासह बँकेच्या एकूण ९३ शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांतर्फे निषेध करण्यात आला.






