“जागतिक अंडी दिवस” निमित्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, शेगाव (बु.) यांच्या वतीने मौजा महालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मानवी आहारातील अंड्याचे पोषणमूल्य, त्यातील प्रथिने, जीवनसत्वे (A, D, E, B12), खनिजे (लोह, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस) आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड यांची सविस्तर माहिती दिली. तसेच अंडे हे संपूर्ण आणि स्वस्त प्रथिनांचा स्रोत असल्याचे सांगण्यात आले. दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश केल्याने मुलांच्या वाढीला, मेंदूच्या विकासाला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मोठी मदत होते, असेही या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. प्रमोद बडोले (सहाय्यक आयुक्त, वरोरा), मिलमीले (सरपंच, ग्रामपंचायत महालगाव), तसेच डॉ. सतीश अघडते (पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, खेमजाई, ता. वरोरा), डॉ. महेश बिबटे (पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, आनंदवन, ता. वरोरा) आणि डॉ. रोहिणी आरजू सोमकुवर (पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, शेगाव (बु.), ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख सागर पाटील सर, मुख्याध्यापक राखुंडे सर (जि.प. प्राथमिक शाळा, महालगाव), तसेच गावंडे सर आणि सागर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना अंडी वाटप करून “जागतिक अंडी दिवस” आनंदात साजरा करण्यात आला.
अंडे हे संपूर्ण आणि स्वस्त प्रथिनांचा स्रोत असल्याने मुलांच्या दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करण्याचे आवाहन डॉ. प्रमोद बडोले, सहाय्यक आयुक्त, वरोरा यांनी केले.






