उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी याचा सन्मान
शेगाव बु
पोलिस स्टेशन शेगाव बू हद्दीतील पोलिस पाटील यांची आज दिनांक ११ मे रोजी मासिक मीटिंग घेण्यात आली. पोलिस पाटील यांना गावातील वाद विवाद, जागा, शेती संदर्भात वाद असतील तर त्यांना आधीच भेटून त्याची माहिती घेऊन पोलीस स्टेशनला कडवावे जने करून आधीच त्यावर योग्य त्या उपाययोजना करता येईल, सीसीटीव्ही लावण्या संदर्भात तसेच इतर महत्वाचे मुद्द्यावर सूचना देण्यात आल्या.
एप्रिल महिन्यात उत्कृष्ट काम करणारे सुसा येथील पुरुष पोलिस पाटील ईश्वर जांबुळे आणि कोकेवाडा (मानकर) येथील महिला पोलिस पाटील यांना पुष्पगुच्छ, सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
तसेच पोलिस स्टेशन शेगाव बू येथील एप्रिल महिन्यात चांगले काम करणारे ग्रेड पी. एस. आय. पीरके आणि पोलिस अमलदार राकेश तुरांनकर यांना पुष्पगुच्छ , सन्मान पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
पी. एस. आय. पीरके हे ३१ मे रोजी पोलिस दलातून रिटायर्ड होणार आहे. तरी सुद्धा सुट्टी न घेता पोलिस स्टेशन चे काम करतात. सर्वांना कामात मदत करतात, जे जबाबदारी त्यांना दिली ते पूर्ण व्यवस्थित पार पाडतात. त्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे गुन्हाचे प्रमाणावर काही प्रमाणात अंकुश बसला आहे.
तसेच पोलिस अमलदार राकेश तुरांनकर हे पोलिस स्टेशन ला सर्वांना मदत करतात. त्यांच्या कडे पी. एस. आय. सरोदे साहेब यांचा लेखनिक म्हणून जिम्मेदारी असली तरी ते सर्वांचे काम करून त्यांना दिलेले कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात.






