spot_img
spot_img
24.7 C
New York
Saturday, August 1, 2026

ॲथलेटिक्स खेळाडू श्रुती कामतवार, साक्षी मशाखेत्री, शालिनी खिरडकर जिल्ह्यात अव्वल

भद्रावती : येथील विवेकानंद महाविद्यालयातील ॲथलेटिक्स खेळाडू श्रुती कामतवार, साक्षी मशाखेत्री, शालिनी खिरडकर यांनी चंद्रपूर जिल्हास्तरीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत पदक प्राप्त करून, विवेकानंद महाविद्यालयाचे नाव लौकिक केले तसेच या खेळाडूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेकरिता निवड झाली. हे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्हास्तरीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयातील खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करून या स्पर्धेत पदक पटकाविले.

श्रुती कामतवार हिने ३००० मीटर धावणे, रजत पदक, ५००० मीटर धावणे कास्यपदक प्राप्त केले. साक्षी मशाखेत्री हिने थाळी फेक मध्ये सुवर्ण पदक, ३००० मीटर धावणे रजत पदक, ५००० मीटर धावणे रजत पदक प्राप्त केले, शालिनी खिरडकर हिने १०० मीटर आणि २०० मीटर धावणे स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले. या खेळाडू च्या कामगिरी मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती चे नाव लौकिक झाले. खेळाडूंनी ॲथलेटिक्स या खेळाचे क्षेत्र निवडून त्यात पराक्रम करून आपल्या जिल्ह्याचे व भद्रावती शहराचे नाव लौकिक केले. श्रुती कामतवार, साक्षी मशाखेत्री, शालिनी खिरटकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता बांबोडे यांना दिले.

चंद्रपूर जिल्हा अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत पदक प्राप्त केल्याबद्दल. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!