spot_img
spot_img
26.6 C
New York
Saturday, August 1, 2026

नंदाई फाऊंडेशन तर्फे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भद्रावती : परंपरा, संस्कृती आणि उत्साह यांचा संगम घडवत भद्रावती शहरातील लक्ष्मीनगर येथे नंदाई फाऊंडेशन तर्फे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. छोट्या शेतकरी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या सणात बालगोपालांनी सजवलेल्या नंदीबैलांसह उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी बाल गोपाल तसेच महिलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांनी रंगांची उधळण करत तान्हा पोळ्याचे महत्त्व रेखाटले, तर महिलांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर निसर्गचित्रे रेखाटली. स्पर्धेनंतर विजेत्यांना बक्षिस वितरण समारंभात गौरविण्यात आले. तान्हा पोळा कार्यक्रमात बाल गोपालांचे नंदी पूजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या नंदीबैलांची पूजा करून मुलांनी आपल्या आनंदाचा ठसा उमटवला. यामुळे कार्यक्रमाला धार्मिक व सांस्कृतिक वातावरण लाभले.

या प्रसंगी नंदाई फाऊंडेशनचे संस्थापक व माऊली क्लिनिक भद्रावतीचे डॉ. अनंत मत्ते, आयोजक केशव बोंडे, मेडले फार्माचे यश साळवे, ट्रायका फार्माचे नंदक कुंभारे, सिप्ला फार्माचे नामदेव पास्तापुरे, मॅनकाईंड फार्माचे प्रज्वल वाळके, अॅलोबाईट फार्माचे श्रीनीवास बोका उपस्थित होते. नंदाई फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अनंत मत्ते यांनी मुलांच्या उत्साहाचे कौतुक करत अशा उपक्रमांमधून संस्कृतीचे जतन होत असल्याचे सांगितले. लक्ष्मीनगरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सणाचा आनंद लुटला. उत्साही वातावरण, मुलांचा सहभाग आणि महिलांची कला यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!