भिसी
भिसी येथील श्री साई कॉन्व्हेन्ट व जिविका इंग्लिश मिडियम स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमांमध्ये शाळेतील मुलं तसेच मुलींचे गोविंदा पथक सहभागी झालेले होते. यामध्ये मुलांच्या व मुलींच्या गोविंदा पथकाने तिन – तिन थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये अथक प्रयत्नानंतर मुलींच्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्यास यश आले व पालकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सर्वांनी दहीहंडीचा आनंद साजरा केला. यामधील विशेष आकर्षण म्हणजेच नर्सरी, केजी-1, केजी टू च्या विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कॉन्व्हेन्ट मधिल राधा व कृष्णा ची वेशभूषा परिधान केलेले चिमुकले बालक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
सर्वांनी दहीहंडी फोडल्यानंतर मोठा आनंद साजरा केला दहीहंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी गोपाळकाला वितरित करण्यात आला या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाकरिता कॉन्व्हेन्ट, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.






