spot_img
spot_img
21.8 C
New York
Thursday, July 30, 2026

माजी विद्यार्थिनीचे जिल्हा परिषद शाळेला संगणक सेट भेट

जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च पदावर गेलेल्या विध्यार्थिनी कडुन समाजाला एक संदेश

सध्या सगळ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांना आपले मूल कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश शिक्षणासाठी टाकायची चढा ओढ सुरु असते. या मध्ये जिल्हा परिषद शाळा मध्ये मुलांची संख्या सध्या कुठेतरी कमी होत आहे. परंतु जिल्हा परिषद शाळेतूनही शिक्षण घेत पुढे जाऊन उच्च पद प्राप्त करता येते हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव ( बु.) या शाळेतील माजी विद्यार्थिनी कु. करिश्मा अशोक निखारे, शेगाव ( बु.) सद्याची नियुक्ती > प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावती हिने दाखवून दिले. करिष्मा हिने आपल्या मिळालेल्या प्रथम पगारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव (बु) पंचायत समिती वरोरा या शाळेस संपूर्ण एक संगणक युनिट शाळेस सामाजिक बांधिलकी जोपासत बक्षीस म्हणून दिले.


कु.करिश्मा निखारे हिने शेगाव बु. शाळेतील तिचे बालपण, आपल्या भावना, आपली कौटुंबिक परिस्थिती, आपले ध्येय, जीवनातील कठीण संघर्ष हे सगळे विद्यार्थ्यांसोबत व्यक्त केल्या. व तिने शाळेतील १४७ विद्यार्थ्यांना पेन पाउच, पेन्सिल, खोडरबर , शापनर दिले. शाळेच्या वतीने करिश्मा चे अभिनंदनपर विशेष आभार या शाळेचे रवींद्र साखरकर, सर मुख्याध्यापक यांनी मानले.
एकंदरीत तिचा संघर्षमय जीवन प्रवास आणि आज मिळालेल्या यशातून जिल्हा परिषद च्या शाळेतून शिकक्षण घेतलेले विध्यार्थी सुद्धा उच्च पदावर जाऊ शकते हे या वेळेला तिने सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!