भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे कार्यरत असलेले डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार यांना worthy welness foundation delhi द्वारा “स्वामी विवेकानंद आदर्श रत्न समान पुरस्कार”त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबाबत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यात कार्य करीत असणाऱ्या मान्यवरांणा प्रदान केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच नागपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ ज्ञानेश हटवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. सोमय्या बाजपेयी फाउंडेशन संचालक आणि शौर्या तिवारी को फाऊंडर हे उपस्थित होते. ही संस्था मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करीत असते.
डॉ. ज्ञानेश हटवार यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन डॉ. विवेक निळकंठराव शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती डॉ. कार्तिक नि.शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. विशाल नि. शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, श्रीमती निलिमाताई शिंदे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. जयंत वानखेडे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. सुधीर मोते प्राचार्य, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती व सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.






