spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

राज्य परिवहन मार्ग च्या बसचा चारगावं धरण जवळ अपघात

रस्त्यालगतच्या दहा फूट खोल खड्ड्यात गेल्याने एक ठार, अनेक प्रवासी जखमी

वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर चारगाव (बु) जवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आगाराची चिमूर चंद्रपूर बस क्र. एम. एच ४० ए क्यू ६१८१ ही आज दुपारी चिमूर वरून चंद्रपूरला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगावं धरण जवळ इरई नाल्याच्या पुलाजवळ सुमारे १० फूट खोल खड्ड्यात गेल्याने अनेक प्रवासी जखमी झालेले आहे. त्या बस मध्ये एकूण अंदाजे ३५ प्रवासी होते. अपघात होताच अपघाताच्या आवाजाने आजु बाजूला शेतात काम करणारे शेतमजूर, शेतकरी यांनी धाव घेऊन त्यातकाळ जखमींना वाहनाच्या बाहेर काढून शेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क केला. व जखमींना खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस चालक सुनील पुसनाके यांना मिरगी येत असल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली तसेच बसचा वाहक सुरेश भटाळकर हा गंभीर जखमी असून त्याला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळता शेगाव परिसरातील तसेच चारगावं गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहणाच्या बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते. वृत्तलीहीपर्यंत वाहनातील जखमींची नावे कळु शकली नव्हती परंतु प्राप्त माहिती नुसार एकाचा उपचारर्थ नेत असताना मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!