चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने मा.विशाल देशमुख साहेब उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांची भेट घेऊन अनेक समस्यांवर निवेदनासह चर्चा करण्यात आली.

मासिक वेतनास होत असलेल्या विलंबाबाबत.सेवानिवृत्तीधारकांना अंशीकरण व उपदान सेवानिवृत्तीचे लाभ तात्काळ देण्यात यावे. मंजूर वैद्यकीय देयकासाठी ऑफलाईन निधी पंचायत समितीला उपलब्ध करून देण्यात यावा. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व गेलेल्या शिक्षकांची डीसीपीएस कपात रक्कम एनपीएस मधे जमा करावी. सातवा वेतन आयोग दुसरा व तिसरा हफ्ता देण्यात यावा. प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करावी. केंद्रप्रमुख पदोन्नती तात्काळ करण्यात यावी. पात्र शिक्षकांना स्थायी आदेश देण्यात यावे. विविध वैयक्तिक समस्या विषयी चर्चा करण्यात आली. सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली.यावेळी मोरेश्वर गौरकर जिल्हा अध्यक्ष,अमोल देठे जिल्हा कार्यवाह, सतिष दुवावार चंद्रपूर अध्यक्ष, किरण लांडे राजुरा कार्यवाह, विलास खाडे कार्याध्यक्ष भद्रावती उपस्थित होते.






