गुन्ह्याच्या दुसऱ्याच दिवशी चोराचा शोध घेत चिमूर पोलिसांची सुपरफास्ट कारवाई
चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळनेरी येथील प्रभाकर दांडेकर यांच्या घरी काल दि. ३० जुलै ला दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरी केल्याची घटना घडली. त्या नुसार फिर्यादी यानू चिमूर पोलीस स्टेशन येथे संबंधित घटनेची माहिती दिली. यावर चिमूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भा. न्या. सं. २०२५ नुसार गुन्हा दाखल करून सुपरफास्ट पद्धतीने सूत्र हलवीत दुसऱ्याच दिवशी गुप्तहेर यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील गुन्हेगार किसन देशकर वय ३३ धंदा मजुरी राहणार आंबोली, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर याला अटक केली असून त्याच्याकडून चोरी गेलेला पन्नास हजार रोख सोन्याची अंगठी वजन तीन ग्रॅम सोन्याची बेसन कानातील सोन्याच्या बाऱ्या असा एकूण संपूर्ण बुद्धिमान जप्त केलेले आहे. सदरची कारवाई चिमूर चे उप विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष बागल चिमूर सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुले कर डीपी पथकातील विलास निमगडे पोलीस हवालदार विशाल गिमेयकार पोलीस आमदार रोहित तुमसरे सचिन खामनकर, सोनु, गीतेश एल्लोरे यांनी केली.






