spot_img
spot_img
29 C
New York
Saturday, June 6, 2026

आंतरराष्ट्रीय वाघ दिनानिमित्त केंद्रीय विद्यालय डिफेन्समध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

भद्रावती : आंतरराष्ट्रीय वाघ दिनाचे औचित्य साधून भद्रावती – चोरा प्रादेशिक क्षेत्रातील डिफेन्स वसाहतीमधील केंद्रीय विद्यालय डिफेन्स, भद्रावती येथे वाघ संवर्धनावरील PPT सादरीकरण आणि चित्रपट प्रदर्शन या जनजागृतीपर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला शाळेच्या प्राचार्य स्वाती विश्वकर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकूटे, सहाय्यक क्षेत्र अधिकारी विकास शिंदे, तसेच बीट गार्ड संदीप पर्वे यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी सार्ड संस्थेचे श्रीपाद बाकरे, अनुप येरणे, शैलेश पारेकर, आणि आशिष चाहकटे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

यावेळी सार्ड संस्थेचे सर्व सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच केंद्रीय विद्यालयाचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भद्रावती – चोरा प्रादेशिक क्षेत्रातील डिफेन्स वसाहतीसारख्या ठिकाणी मानव व वन्यजीव यांचा निकटचा सहवास असल्याने अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. या उपक्रमाचे स्थानिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!