spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

यशवंतराव शिंदे विद्यालय व क.महाविद्यालय, चिचोर्डी येथे शालेय मंत्रीमंडळाची स्थापना


भद्रावती :

लोकशाही मूल्याची रुजवणूक करण्याकरिता व प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा या हेतूने स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी येथे २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. सुधीर मोते यांचे मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात आली. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री कु.तनुजा तेलंग, उपमुख्यमंत्री विराज सालुलकर, शिक्षणमंत्री कु. जान्हवी कुळसंगे, क्रिडामंत्री नैतीक शेडामे, सांस्कृतिक मंत्री कु. दानवी नागरे, पर्यटन मंत्री ओम कुरेकार, स्वच्छतामंत्री गणराज बावणे, आरोग्यमंत्री कु. नंदिनी ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री कु. आशिया पठाण, शा.पोषण आहार मंत्री विहान नागदेवते इ. मंत्र्यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुहास कोल्हे यांनी काम पाहिले. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती व शपथ देऊन अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!