spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

मुलानेच केली जन्मदात्या पित्याची हत्या

कुऱ्हाडीचे घाव घालून पित्यालाच पाठवले यमसदणी

मुलाच्या क्रूर कृत्याने शेगाव हादरले

वरोरा तालुक्यातील शेगाव बु मधील विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे आज सकाळी मुलानेच आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने सपा सप वार करत जागीच ठार केले. ही घटना ११ वाजता घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब पत्रुजी दातारकर (वय५८)असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलगा अभय गुलाब दातारकर(वय३४)वर्ष असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार वडील घरी बसून असताना आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने एकावर एक वार करून जागीच ठार केले. या बाबतची माहिती स्थानिकांना मिळताच घटनेची माहिती शेगाव बु पोलिसांना देण्यात आली.घटनास्‍थळी पोलीस तात्‍काळ दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून खुणाचे नेमके कारण अद्याप कडू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिह यादव यांचे मार्गदर्शन मध्ये PSI सुमित कांबळे, ASI दिनकर घोटेकर मदन येरणे,निखिल कौरासे, छगन जांभुळे,दिनेश ताटेवार, पोलिस शिपाई संतोष निषाद, प्रशांत गिरडकर,प्रगती भगत हे करीत आहेत..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!