भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात 15 जुलैला महाविद्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक युवा कौशल्य दिन आणि पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” पार पडला.

या मेळाव्यामध्ये एकूण ९ उद्योग व कंपनी सहभागी झाल्या होत्या. ओमॅट वेस्ट प्रा. लि., चंद्रपूर के. एस.ग्रुप हैदराबाद, विदर्भ क्लिक 1, सोल्युशन, चंद्रपूर, वैभव इंटरप्राइजेस, नागपूर, डिक्साॅन इंजीनियरिंग प्रा. लि. नागपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स चंद्रपूर फील्ड वर्कर, संसुर सृष्टी इंडिया प्रा. लि. चंद्रपूर,महाराष्ट्र कार्बन प्रा. लि. चंद्रपूर , धूत ऑटोमोटिव सिस्टम प्रा. लि. औरंगाबाद या नामवंत उद्योग आणि कंपनींनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. महाविद्यालयातर्फे उमेदवारांची नोंदणी करून घेण्यात आली. एकूण ४४० उमेदवारांनी नोंदणी करून प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. विविध उद्योगांतर्फे व कंपनीतर्फे एकूण 143 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मेळावा उद्घाटन सोहळ्यात तहसीलदार राजेश भांडारकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहआयुक्त अनिसा तडवी आणि यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मेळावा आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. नगरपरिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, संस्थेचे सहसचिव राजेंद्र गावंडे, संस्थेच्या सदस्या डॉ. मायाताई राजुरकर, उद्योजक गिरीश पदमावार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक पद्मावार यांनी प्रेरक मार्गदर्शक म्हणून उपस्थित उमेदवारांना रोजगार, रोजगारांच्या संधी आणि कौशल्य विकास यावर सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुधीर आस्टुनकर यांच्या नियंत्रणात पार पडलेल्या या मेळाव्यात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता चंद्रपूर चे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेऊन हा मेळावा यशस्वी पार पाडला.






