वरोरा : तालुक्यातील कोसरसार मकसुर शिवारात वीज पडून शेतमजुराचा मृत्यू झाला. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास शेतात पराठी खुरपण्याचे काम चालू असताना अचानक विजेचा गडगडाट चालू झाला. लपण्यासाठी शेतमजूर रावबा दादाजी मंगाम वय 45 हे विजेपासून बचावासाठी शेतात असलेल्या पळसाच्या झाडाखाली लपण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्याच्यात त्याची प्राणज्योत मावळली. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेंद्रशिंग यादव यांना कळविण्यात आली त्यांनी आपली टीम पाठवून जागेचा पंचनामा करून शविच्छेदना साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. रावबा दादाजी मंगाम यांच्या मागे पत्नी दोन मुली एक मुलगा असा छोटासा परिवार आहे त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावातील सरपंच गणेश मडावी यांनी केली आहे






