spot_img
spot_img
23 C
New York
Monday, June 8, 2026

भद्रावती नगर परिषदेवर जप्तीची कारवाई ………. भाजी बाजाराच्या जागेचा किराया दिलाच नाही………. ४९ लाख होते थकीत

 

भद्रावती :-

नगरपरिषद भद्रावतीच्याद्वारे भाजी बाजार जागा भाड्याने घेऊन भरवल्या जात होता . भाजी बाजाराच्या जागेचा ६६ लाख रुपये किराया भद्रावती नगर परिषदेने जागा मालकाला न दिल्याने नगरपरिषद मालमत्ता जप्त करण्याची नामुष्की भद्रावती नगर परिषदेवर दि.३० जून रोजी ओढवली.

      येथील मुरलीधर पाटील गुंडावार मंगल कार्यालयाचे मालक तथा प्रतिष्ठीत व्यापारी संजय गुंडावार यांच्या मालकीची बगडे वाडीतील जागा नगर परिषदेने सन २०१७ मध्ये भाजी बाजारासाठी किरायाने घेतली. अनेक दिवस तेथे भाजी बाजार भरला. परंतु नगर परिषदेने दीड वर्षपर्यंत नियमित किराया दिला.  त्यानंतर वारंवार किरायाची मागणी करुनही गुंडावार यांना किरायाची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे गुंडावार यांनी अखेर ऑक्टोबर २०२० मध्ये वरोरा येथील दिवाणी न्यायालयात नगर परिषदेच्या विरोधात खटला दाखल केला. या खटल्याचा निकाल २०२३ मध्ये गुंडावार यांच्या बाजूने लागला. दरम्यान, दि.२४ जुनं २०२५

रोजी न्यायालयाने नगर परिषदेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि.३० जून रोजी दुपारी १.२० वाजता न्यायालयाचे बेलिफ आशिष वांढरे यांच्या उपस्थितीत न. प. कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यात मुख्याधिकारी यांची महेंद्र बोलेरो गाडी क्र.एम.एच.३४, ८५५८ जप्त करण्यात आली. तसेच ३ प्रिंटर्स, संगणक, मुख्याधिकारी यांची खूर्ची, कॅबीनमधील टी.व्ही., संगणक, ९ खुर्च्या, ३ सोफा सेट आदी वस्तुंचा समावेश आहे. यावेळी पंच म्हणून शिवसैनिक सूरज शाहा आणि सुनील निंबाळकर उपस्थित होते.

      दरम्यान, नागरिकांनी कर भरला नाही म्हणून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते. त्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जातात. भद्रावती नगर परिषद आपल्या क्षेत्रातील करधारकांकडून कर नियमितपणे वसूल करत असतो. तसेच बाजाराची कर वसुली सुद्धा व्यापाऱ्यांकडून केली जाते. मग हा सर्व पैसा कुठे खर्च केला जातो? मुख्याधिकारी म्हणतात नगरपरिषदेची आर्थिक स्थिती चांगली नाही,हे मात्र हास्यास्पद वापते. नागरिकांवर जप्तीची कारवाई करणाऱ्या नगरपरिषदेवरच जप्तीची कारवाई करण्याची वेळ आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!