spot_img
spot_img
18.2 C
New York
Monday, June 8, 2026

आयदा अन्सारी वीज्ञान व राई दास वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम….

एच एस सी निकालात यशवंतराव शिंदे क. महाविद्यालय भद्रावती तालुक्यात अव्वल….

भद्रावती

नुकताच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा बारावी चा निकाल जाहीर झाला. या निकालात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती ने उज्वल निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी उत्कृष्ट निकाल दिला.

नुकत्याच घोषित झालेल्या बारावीच्या निकालात विज्ञान विभागात कु. आयदा परवीन अन्सारी हिने ८८% गुण घेत विज्ञान विभागात तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर भाग्यश्री विजकापे हिने ८५ % गुण घेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. सोबतच फिरदोस इसाक शेख ह्या विद्यार्थीनीने ८४.१७% गुण घेत तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. या महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील १६ विद्यार्थी हे प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणी मध्ये ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल हा ९८.६० % लागला असून याही वर्षी उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील वाणिज्य शाखेतील कु. राई गोपाल दास या विद्यार्थिनीने ८८.८३% गुण घेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला तर निहारिका निरंजन बेहरे या विद्यार्थिनीने ७२% गुण घेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक घेतला. शरद सूर्यभान धारणे या विद्यार्थ्याने ७०% गुण घेऊन तालुक्यातील तृतीय येण्याचा मान पटकावला. वाणिज्य शाखेचा महाविद्यालयाचा निकाल हा ७६ टक्के लागला आहे.

याच महाविद्यालयातील कला शाखेची कु साक्षी मनोहर भोयर ह्या विद्यार्थिनींनीने ६४% गुण घेत महाविद्यालयातून कला शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. निकिता शंकर दडमल हीने ६२.१७% गुण घेत महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक घेतला, तर सागर रामदास गजभे व मीनाक्षी प्रदीप गेडाम यांनी ५७ % गुण घेत महाविद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल हा ६० % लागला आहे.

याच महाविद्यालयातील एमसीव्हीसी विभागाचा निकाल हा ६३% लागला असून प्रथमेश खोब्रागडे या विद्यार्थ्याने ६५ टक्के घेऊन महाविद्यालयातून या विभागात प्रथम क्रमांक तर कु सुहानी भोसकर ६३ % गुण घेऊन महाविद्यालयातून व्दितीय क्रमांक पटकाविला.

पुन्हा एकदा यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीने क्रीडा क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा उत्तम कामगिरी बजावत भद्रावती तालुक्यातील आपले स्थान कायम ठेवले आहे. महाविद्यालयाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसोबत महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जयंत वानखेडे, विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे होते , तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुधीर मोते सर व पालक प्रतिनिधी भोसकर साहेब व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डाॅ ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!