spot_img
spot_img
23 C
New York
Wednesday, August 5, 2026

श्रीरामाच्या भव्य शोभायात्रेने भद्रावती नगरी दुमदुमली


भद्रावती येथे हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत पार पडली भव्य शोभायात्रा


भद्रावती


येथील श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे ६ एप्रिल ला श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले यावेळी जय श्रीराम जय जय श्रीराम च्या निनादाने भद्रावती नगरी दुमदुमून गेली होती. संपूर्ण शहर शोभायात्रेने श्री राममय झाले होते.


सकाळी १०.३० वाजता निंबाजी महाराज तागड यांचा श्रीराम जन्मावर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ७.०० वाजता विठ्ठल मंदिर देवस्थान येथून रथावरील नयनरम्य आकर्षक प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे पूजन करून भव्य शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, संयोजक चंद्रकांत गुंडावार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे, ठाणेदार लता वाडिवे, हाजी बबन सेठ, धनराज आस्वले, प्रफुल चटकी, नंदू पढाल, भुजंगराव खानोरकर, ताजने गुरुजी, निलिमाताई शिंदे, गैनवार उपस्थित होते.


विठ्ठल मंदिर देवस्थान किल्ला वार्ड येथुन प्रारंभ झालेल्या या भव्य शोभायात्रेमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनावर आधारित अनेक आकर्षक नयनरम्य देखावे दाखविण्यात आले होते तसेच झेंडा पथक, बँड पथक, शेकडो भजनी दिंडी अशा विविध पथकांनी भद्रावतीकरांचे लक्ष वेधले. शहरातून निघालेल्या या भव्य मिरवणुक मार्गावर स्वच्छता करून, ठिकठिकाणी स्वागतदार , विद्युत रोषणाई , ध्वनी क्षेपक ,भगवे ध्वज , श्रीरामाचे बॅनर लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे नगर परिषद चौकामध्ये आकर्षक राम मंदिर प्रतिकृती कॅटरिंग असोसिएशनचे वतीने उभारण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये सर्वधर्मीय सामाजिक संस्था तर्फे श्रीरामाचे स्वागत द्वार लावून, जलपान,शरबत,मिठाई, अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती. यातून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडले.मिरवणुक मार्गावर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय शोभायात्रा पाहण्यासाठी जमला होता.त्यामुळे भद्रावती नगरीचे वातावरण राममय होवून ,जनुकाही अयोध्याच अवतरली होती.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चंद्रकांत गुंडावार, गोपाल ठेंगणे, अमोल गावंडे, अशोक उपलांचीवार, प्रकाश आईचवार, मुरलीधर मेश्राम, सुनील पोटदुखे, झनक चौधरी, उल्हास भास्करवार, अमित गुंडावार, सचिन सरपटवार, रूपचंद धारणे, राजेश्वर मामीडवार विशाल गावंडे , गुणवंत कुत्तरमारे,शरद राजूरकर, विनोद पांढरे,सौरभ घागी, अनंता ताठे, मारोती कोरेवार,अशोक गौरकार, मधू सावनकर , भोगेकर सर, रामभाऊ बिरे, दत्तजी गोवारदीपे,शंकर पत्तीवार, गणपत ठाकरे, भास्कर फाये ,अनिल बगडे, मनोज बोरसरे, क्षितिज शिवरकर, महेंद्र वनकर व समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पोलीस स्टेशन, नगरपरिषद व तहसील कार्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!