spot_img
spot_img
26.6 C
New York
Saturday, August 1, 2026

अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

तिरवंजा व मासळ वन क्षेत्रात कारवाई

भद्रावती : वनपरिक्षेत्रातील तिरवंजा व मासळ नियतक्षेत्रामधील अवैधरित्या वाळु (रेती) उत्खनन करून वाहतुक करीत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक व चमूने टाकलेल्या धाडीत २ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदरची कारवाई शुक्रवार दि.५ एप्रिलला सकाळी ७ वाजता करण्यात आली.

या कारवाईत तिरवंजा निवासी ओम पिंपळकर याच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४-बिएफ-२५२३ व ट्रॉली क्रमांक एमएच-३४-एपी-२४९२ तसेच अनुराग येरगुडे याच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३३-एफ-४०१४ व ट्रॉली क्रमांक एमएच-३४-बीवी-६७९३, व आष्टी येथील रुपेश उईके याच्या मालकीचे महिंद्रा ४७५ डीआय सरपंच ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४-सीडी-४६९८ व ट्रॉली नंबर क्रमांक नसलेली, महिंद्रा युओं टीसीएच ५४८ डीआय क्रमांक नसलेला ट्रॅक्टर , व क्रमांक नसलेली ट्रॉली, शासकीय वनातील राखीव वन कक्ष क्रमांक २०३ नियतक्षेत्र तिरवंजा व कक्ष क्रमांक २१९ नियतक्षेत्र मासळ मधील नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले असता ट्रक्टर वरील वाहन चालक यांना त्यांचेकडे रेती उत्खनन व वाहतुक परवानाबाबत कागदपत्र असल्यास दाखवण्यास सांगीतले असता. त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र दिसुन आले नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आणि वाहन मालकावर वन गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाईत व्ही.व्ही. शिंदे क्षेत्र सहाय्यक भद्रावती,ए. बी. शेळकी क्षेत्र सहाय्यक मासळ, एस. एस. मेश्राम वनरक्षक मासळ, कु.जे.एम. माहुलीकर वनरक्षक तिरवंजा, डी. एम.गेडाम वनरक्षक भद्रावती, पवन मांढरे, नितिन राऊत,अनिल शेंद्रे, किशोर मडावी व विकास धांडे, यांनी मोहीम यशस्वी केली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!