भद्रावती
इनरव्हील क्लब ऑफ भद्रावती आणि पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळा, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १९/३/२०२५ रोज बुधवार ला व्याख्यान आणि परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कु.वनिता कोरडे मॅडम मुख्याध्यापक, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ केशनी ज्ञानेश हटवार मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सौ .प्रेमा पोटदुखे, सौ. वर्षा धानोरकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री दीपक पोटे हे व्वयासपीठावर उपस्थिती होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपणास वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन आकाशवाणीवर ज्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले अशा सौ. कशनी हटवार यांनी आपल्या मुख्य मार्गदर्शनातून केले. विद्यार्थ्यांना विविध दृष्टांत देऊन ही बाब त्यांना समजावण्यात आली. त्यानंतर इनरव्हील क्लब भद्रावती च्या अध्यक्षा सौ. प्रेमा पोटदुखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली गुड टच व बॅड टच यावर माहिती सांगितली, तर वर्षा धानोरकर यांनी प्रोटीन युक्त सकस आहार मुलांनी घेतला पाहिजे यावर माहिती दिली, सुनिता खंडाळकर यांनी आनंदी जीवन यावर आपले मनोगत व्यक्त केले .
या आ कार्यक्रमाला स्वाती चारी, सौ. रश्मी बीसेन, मनीषा ढोमणे, सौ. स्वरूपा पाटील, सौ. वैशाली सातपुते, सौ. हेमलता ठीकरे, सौ. तृप्ती हिरादेवे या ईनरव्हील सदस्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा शेंडे मॅडम यांनी केले तर आभार सौ. प्रिया मसराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. प्रतिभा धकाते आणि शाळेतील विद्यार्थी यांनी सहकार्य केले.






