भद्रावती : अविष्कार फाउंडेशन इंडिया शाखा नागपूर जिल्हा तर्फे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगीता आर. बांबोडे यांचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील सहभाग व मार्गदर्शन याची दखल घेत अविष्कार फाउंडेशन इंडिया शाखा जिल्हा नागपूर तर्फे २०२५ चा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झाला आहे.सदर पुरस्कार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागपूर येथे दिनांक १६ मार्च २०२५ ला प्रदान करण्यात येईल, अशी माहिती आविष्कार फाउंडेशन इंडिया चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे.

प्रा. संगिता आर. बांबोडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई सुमित्राबाई बांबोडे, वडील ऋषी बांबोडे आणि विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, अभिजीत बोतले, राजेंद्र गावंडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार करवंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, डॉ. अनिता लोखंडे, डॉ. राकेश तिवारी, डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. दिलीप जयस्वाल आदींनी प्राध्यापिका संगिता बांबोडे यांचे अभिनंदन केले व सहर्ष शुभेच्छा दिल्या.






