भद्रावती : कोरोना काळापासून पिपरी ( देश ), कोच्ची, घोनाड, मूरसा या गावामध्ये बस फेरी बंद झाली. तेव्हा पासून या गावांमध्ये एस.टी. येत नव्हती. या भागातील शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विध्यार्थ्यांना ऑटो, टू व्हीलर ने भद्रावती व चंद्रपूरला शिक्षण घेण्यास जाण्यासाठी फार मोठ्या अडचणी येत होत्या. वयोवृद्धांना तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना, बँकेचे कामाकरीता जाणे येणे फार कठिन झाले होते.

त्याकरीता अखिल युवा शक्ती सोशल वेल्फेअर फाऊंडेशन चे जिल्हा अध्यक्ष शुभम दिलीप मते, घोनाड व सर्व सदस्य हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा पूर्व केंद्रिय गृह राज्यमंत्री भारत सरकार तसेच करण देवतळे, आमदार, वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र याना भेटून चंद्रपूर ते पिपरी बस सेवा सुरु करण्याकरीता निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला व युवा शक्ति सोशल वेल्फेअर फाऊंडेशन ला यश आले. आज दि.०३ मार्चला पिपरी (देशमुख) येथे बस आली. सदर बस ही चंद्रपूर आगारातून सकाळी ९.३० ला सूटत असून पिपरी येथे १०.३० वाजता पोहचते तर सायं. ०५.३० ला चंद्रपूर बसस्थानकातून सूटत असून ०६.३० वाजता पिपरीला पोहचते. लालपरिचे गावकऱ्यां मार्फत तसेच युवाशक्ती चे सर्व कार्यकर्ते मूरसा, घोनाड, कोच्ची येथील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने पिपरी ( देश ) येथे उपस्थित झाले होते. गावात बस आल्यानंतर बस चालक, वाहक यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.






