spot_img
spot_img
23.4 C
New York
Monday, June 8, 2026

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन

जि.प. शाळा विजासन येथील आरोग्य शिबीरात १३३ मुलांची तपासणी

भद्रावती : पंचायत समिती अंतर्गत जिल्ह्य परिषद उच्च प्राथमिक शाळा विंजासन येथे आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या वतीने आरोग्य शिबीर घेऊन १३३ मुलाची तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहीम व उद्घाटन सोहळा व्हीसी द्वारे प्रक्षेपणाचे प्रसारण दाखवण्यात आले. हा संपूर्ण राज्यात ३५० तालुक्यात सदर कार्यक्रमाचा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी बंडूजी आकनुरवार होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनीष कुमार सिंग, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आसुटकर, डाॅ.अडगुरवार, केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन दानव, मुख्याध्यापिका अनिता पेंदाम ,सरिता मामीडवार, अमोल व-हाडे, सुनिता चांदेकर, शुभांगी डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रथम धनक देवीचे दिव्पप्रज्वलन करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत राज्यात होत असलेल्या उद्घाटन सोहळा व विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचे व्हीसी द्वारे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी अनिल धानोरकर यांनी विशेष आरोग्य तपासणीचा लाभ मुला मुलीनी, पालकांनी घेण्याचे आवाहन केले. डॉ.बंडू आकनुरवार, डॉ.मनीष सिंग, डॉ.आसुटकर, मोरेश्वर विद्दे यांनी केले. कार्यक्रम गट विकास अधिकारी मा.आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.अडगुरवार,संचालन व आभार श्वेता कंचर्लावार यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी शाळेला उपलब्ध असलेल्या ऍस्ट्रॉनॉमी लॅबची माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली.शिक्षक वृंद व विद्यार्थीनी डॉ.प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्य करीत असल्याचे सांगीतले.उपस्थितीनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!