spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

प्रा. संजय लेनगुरे राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित…!

सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव…..

भंडारा

प्रतिनिधी दि. 17 फेब्रुवारी 2024.

 महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 16 फेब्रुवारी 2025 ला स्थानिक लक्ष्मी सभागृह भंडारा या ठिकाणी,  राज्य अध्यक्ष शालिनी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी भंडारा - गोंदिया क्षेत्राचे  खासदार  मा. डॉ. प्रशांत पडोळे, राज्य नेते  डॉ. गंगाधर सोनकांबळे,  उमरेड क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजय मेश्राम, नागपूर विभागाचे पदवीधर आमदार  मा.  अभिजीत वंजारी, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी  श्री. एन. ए. ठमके, डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. रेणुकादास उबाळे, महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक मा. मुबारक अली सय्यद,  मा. प्रवीण मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले.

    यामध्ये प्रामुख्याने नगरपरिषद नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील मराठी विषयाचे शिक्षक, तसेच 
मराठी विषय शिक्षक महासंघाचे कर्तव्यदक्ष खजिनदार (राज्य) 
प्रा. संजय लेनगुरे तुमसर, यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रा. संजय लेनगुरे यांच्या मागील कोरोना काळापासूनच्या कार्याच्या आढावा घेतल्यानंतर, शिक्षक संघटनात्मक कार्य करणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच कोरोना काळापासून तर आजतागायत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महिन्याला एक ऑनलाइन जिल्हास्तरीय स्पर्धा राबवून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम करतात.

प्रा. संजय लेनगुरे हे मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य कोषाध्यक्ष पद सांभाळून, भंडारा जिल्ह्यात विज्युक्टाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तुमसर तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करतात. तर शाळा बचाव समितीचे जिल्हा सचिव म्हणून कार्य करतात. तसेच शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा कार्य करतात. त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांच्या राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहेत.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!