वरोरा
नुकतेच कै. निळकंठराव शिंदे प्रशा. सेवा महाविद्यालय वरोरा येथे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये तसेच स्वायत्त महाविद्यालये यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी परदेशी विद्यापीठे व महाविद्यालयांशी जोडण्याच्या हेतूने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) हे भारतातील शिक्षणाचा प्रचार, प्रसार आणि नियमन करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेले एक धोरण आहे. स्वतंत्र भारतानंतर हे चौथे शैक्षणिक धोरण आहे, यामध्ये प्राचीन शिक्षण प्रणाली, तसेच सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण प्रणाली चा मुदेसुत अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सामाजिक उलाढाल, अभ्यासक्रम पद्धती, Skill Development, तसेच या धोरणामुळे विध्यार्थ्यांमधील शारीरिक, मानसिक, नैतिक शक्तींचा विकास कसा जास्तीत जास्त होईल याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सचिव श्री माननीय डॉ. कार्तिक शिंदे सर यांनी शैक्षणिक धोरण 2020 यावर भाष्य केले. माननीय श्री नरेंद्र कन्नाके सर नेहरू कनिष्ठ महाविद्यालय शेगाव यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत विद्यार्थ्यांना, प्राध्यापक वर्गांना मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे, हेतू समजावून सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्या मागचा हेतू स्पष्ट केला. यानंतर ए.एन. आत्राम सर आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये काय बदल घडवून आला . याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच आचार्य परमानंद तिराणिक कला शिक्षक आनंद अंध विद्यालय आनंदवन यानंतर तिराणिक सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री माननीय अजय रामटेके सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 तत्त्वांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रमोद पाठक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सीमा बोभाटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित आनंद सागर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कुमारी स्नेहा गिरडे मॅडम तसेच प्रा. रुपेश टाले सर प्रा. प्रणाली नरड मॅडम, प्रा.पियुष लांडगे सर असेच शिक्षकेतर कर्मचारी इंदिरा निखाडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






