spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

श्री शिव छत्रपती महाविदयालयात शिक्षकांची आरोग्य तपासणी शिबिर

जुन्नर :

श्री शिव छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय स्टाफ ॲकेडमी व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ महादेव वाघमारे होते. प्रमुख पाहुणे डॉ अमेय डोके यांनी सर्व प्राध्यापक वृंदाना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. सध्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शेतीसाठी रसायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्याकडे भर दिला पाहिजे .

समाज सक्षम व सुदृढ बनविण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्गांमध्ये आरोग्य जनजागृती करण्याचे काम प्राध्यापकांनी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी व समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते, प्रा कुंडलिक नेटके, प्रा संजय इंगळे, प्रा अन्नपूर्णा ढोले, प्रा राजेश कांबळे , प्रा चंद्रकांत कांबळे, प्रा नचिकेत धर्माधिकारी, प्रा कविता कोकाटे इत्यादी मान्यवर व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा निलेश आमले यांनी केली . सूत्रसंचालन प्रा वैशाली सावंत व प्रा तृप्ती लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!